
बीड प्रतिनिधी : डॉ.संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी शहरातील बशीरगंज भागातील टॉवरवर चढत आंदोलकांनी आंदोलन केले.
डॉ.संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी.महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा.मा. खा.रणजीतसिंह निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि दोषींना कठोर शिक्षा करावी अशा आशयाचे निवेदन तयार करून येथील मोहन आघाव, माऊली सिरसाट आणि केशव तांदळे यांनी आज बुधवार (दि.२९) रोजी दुपारी शहरातील बशीरगंज भागातील बीएसएनएल टॉवरवर आंदोलन केले. यावेळी टॉवरवर चढून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती केली. टावरवर चढून आंदोलन सुरू असल्याचे पाहून या भागात मोठी गर्दी झाली होती
