
बीड प्रतिनिधी : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या आणि सामाजिक सलोख्याच्या बाबतीत होरपळलेल्या बीड जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादी मधील वेगळाच ‘राजकीय सलोखा’ अनुभवायला मिळाला. एरव्ही सत्ताधान्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास टाळणारे बीड मधील शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली,तर खा. बजरंग सोनवणे हे तर थेट अजित पवारांच्याच हेलिकॉप्टरमधून पुष्याला गेले. किरकोळ कारणांवरून एकमेकांशी भांडणाऱ्या कार्यकत्यांसाठी नव्या वर्षाचा हा नवा ‘राजकीय संदेश महत्वाचा ठरावा, बीड जिल्हा तसा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील दरी बीड जिल्ह्यात नेहमीचीच, अगदी विरोधी आमदारांना निधी न देण्यापासून ते विरोधकांनी नियोजन समितीच्या बैठकांना देखील उपस्थिती न लावण्यापर्यंतचा राजकीय बिरोध बीड जिल्ह्यात नेहमीच पाहायला मिळतो. बगळता विरोधक सहसा उपस्थित राहत नाहीत हा देखील बीडचा इतिहास, त्यामुळे मग एका पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या कार्यकत्यांसोबत अगदीच शत्रूसारखेच वागतात. अशा बीड जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मात्र वेगळाच
सलोखा पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हापरिषदेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकदा रद्द झालेला अजित पवारांचा दौरा पुन्हा अचानक जाहीर झाला, आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आ. सोळंके आणि आ. पंडित यांच्यासोबतच भाजपचे आ. सुरेश धस या सत्तेतल्या लोकांसोचतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील आवर्जून हजेरी लावली. खरेतर हा कार्यक्रम तसा साराच प्रशासकीय स्वरूपाचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच आयोजिलेला, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी देखील कार्यक्रमापासून काहीसे लांबच होते, मात्र लोकप्रतिनिधी असल्याच्या ‘जबाबदारीच्या’ जाणिवेतून विरोधीपक्षांच्या लोकप्रतिनिधींची या कार्यक्रमाला उपस्थिती चर्चेची तर ठरलीच, पण कार्यकत्यांना वेगळाच ‘राजकीय संदेश’ देणारी देखील ठरली. त्यातही खा. बजरंग सोनवणे यांच्यासाठी स्वतः अजित पवारांनी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये जागा उपलब्ध करून दिली. आता राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ सुरु असताना बीडमध्येच अंतर कशाला असेही कदाचित या लोकप्रतिनिधींना वाटले असावे
