विषय समित्यांच्या निवडीवर लोकविकास महाआघाडीचा वरचष्मा
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या सदरील निवडीवर लोकविकास महाआघाडीने आपला वरचष्मा कायम ठेवला. राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकविकास महाआघाडीचे सर्वाधिक २० नगरसेवक निवडून आले. तसेच २ स्विकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून अंबाजोगाई नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी करण्यात आल्या. यात स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी दिनेश भराडीया, बांधकाम समिती सभापतीपदी नजीर (मुन्ना) पठाण, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सौ.संगीताताई दाजीसाहेब लोमटे, नियोजन समिती सभापतीपदी ऍड.विकास काकडे, शिक्षण व क्रीडा समिती सभापतीपदी शेख शमीम शेख रहिम, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शेख शिरीन अशफाक तसेच स्थायी समितीच्या सदस्यपदी राजपाल जावळे व सौ.रेखाताई विलास जाधव यांची नियुक्ती झाली आहे. सर्वच निवडी बिनविरोध झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
या निवडींमुळे लोकविकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, गटनेता व स्विकृत नगरसेवक, विषय समित्यांचे सर्व सभापती यांच्यावर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी पिठासीन अधिकारी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे तसेच कार्यालयीन अधिक्षक सय्यद अन्वर यांच्या उपस्थितीत लोकविकास महाआघाडीचे संख्याबळ पहाता विषय समित्यांसाठी अन्य कोणाचेही उमेदवारी अर्ज न आल्याने सदरील निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी लोकविकास महाआघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक बबनराव लोमटे, ज्येष्ठ नगरसेवक हाजी इस्माईल गवळी, नगरसेवक महेश लोमटे, नगरसेवक मालू जोगदंड, नगरसेवक आकाश कराड, नगरसेवक महेश कदम, नगरसेवक सौ.जयश्रीताई पृथ्वीराज साठे, नगरसेवक सौ.दिपाताई बबन ऊर्फ दाजीसाहेब लोमटे, नगरसेवक बशीरा शफीक सय्यद, नगरसेवक नाजनीन बेगम अकबरखाँ पठाण, नगरसेवक सौ.श्रुतीताई अमोलराव लोमटे, नगरसेवक सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे हे लोकविकास महाआघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया, गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक बबनराव लोमटे, ज्येष्ठ नगरसेवक हाजी इस्माईल गवळी व सर्व नगरसेवकांनी नुतन विषय समित्यांच्या सभापतींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, व आगामी काळात अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी अमोल लोमटे, भिमसेन लोमटे, अकबरभाई पठाण, सचिन जाधव, ऍड.अनिल लोमटे, जफरभाई शेख, रौफभाई बिल्डर, जावेद गवळी हे उपस्थित होते. लोकविकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांकडून निवडींचे स्वागत करून फटाके फोडून, पेढे वाटून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
सर्व सभापती अंबाजोगाईच्या विकासासाठी दक्ष :
लोक विकास महाआघाडीचे उपनगराध्यक्ष, गटनेता, नवनिर्वाचित सर्व २० नगरसेवक, २ स्विकृत सदस्य, एकत्रित येत सर्वानुमते नगरपरिषदेत अंबाजोगाईच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतील. योग्य ती दक्षता घेतील. आमच्या सहकाऱ्यांच्या सर्वच विषय समित्यांवर बिनविरोध सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मिळालेल्या संधीचे ते सोनं करतील असा आम्हाला विश्वास आहे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास हा आपला नेहमीचा मानक आहे. विषय समित्यांच्या निवडी करताना व जबाबदाऱ्या देताना सामाजिक अभिसरण व ज्येष्ठ व नव्या प्रतिनिधींची सांगड घालण्याचा आमचा विधायक प्रयत्न आहे.
