बीड प्रतिनिधी :- बीड जिल्यातील आत्महत्या चे प्रमाण वरच्या वर वाढतच चालले आहे दिनांक ०८ एप्रिल बुधवार रोजी बीड शहरातील नगर रोड परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली असून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय (वय 42) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे
ही घटना नगर रोडवरील समर्थ मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या लोकाशा नगर परिसरात घडली. बाळकृष्ण जायभाय हे सध्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस दलामध्ये कर्तव्यदक्ष,मनमिळावू म्हणून व सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून जायभाय ओळखले जात होते. जायभाय हे बीड स्थानिक गुन्हे शाखा तसेच गेवराई पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले होते यामुळे ते बीड जिल्ह्यात सर्वतो परिचित होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे पोलीस दलात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
