अंबाजोगाईब्रेकिंग न्यूज

*केजमधील कै.श्री. ‎गोपीनाथरावजी मुंडे सभागृहासाठी आणखी पाच कोटींचा निधी मंजूर* *आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नाने मिळाला एकूण दहा कोटींचा निधी

केज – केज शहरात लोकनेते कै. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने भव्य सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपये मंजूर केले होते. हे सभागृह अधिक अद्ययावत करण्याच्या उद्देशाने केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी वाढीव निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या सभागृहासाठी राज्य शासनाने आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यानिमित्ताने नमिता मुंदडा यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी जिव्हाळ्याचे असलेल्या या भव्यदिव्य सभागृहाच्या निर्मितीचे स्वप्न लवकरच साकारणार आहे.

केज शहराचा विस्तार वेगाने होत आहे. शहराची लोकसंख्याही ५० हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सांस्कृतिक‎ कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची जागा‎ असावी, अशी मागणी‎ नागरिकांकडून सातत्याने होत होती.‎ नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा असलेला सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न हाती घेत आ. नमिता मुंदडा यांनी केज शहरात लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने भव्यदिव्य सांस्कृतिक‎ सभागृह उभारावे, अशी मागणी‎ शासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. आ. मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत ‎नगरविकास‎ विभागाने नगरपरिषदांना‎ वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष‎ अनुदान योजनेंतर्गत केज नगर पंचायत क्षेत्रात कै.श्री. गोपीनाथरावजी मुंडे साहेब सभागृह उभारण्यास ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात‎ केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा शासनाने या सभागृहासाठी उपलब्ध करून दिली. निविदाप्रक्रिया पार पडून या सभागृहाच्या बांधकामास सुरुवात देखील झाली आहे. मात्र, हे सभागृह अधिक अद्ययावत करण्यासाठी आ. मुंदडा यांनी वाढीव निधीची मागणी शासनाकडे लावून धरली होती. हि मागणी देखील मान्य करत शासनाने या सभागृहासाठी सोमवारी (दि.१३) आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे एकूण दहा कोटी रुपये निधीतून निर्माण होणारे हे भव्यदिव्य अद्यायवत सभागृह केज शहराच्या वैभवात भर घालणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893907
error: Content is protected !!