धाराशिव प्रतिनिधी :
मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याच गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी धाराशिवमधील मुरुम गावच्या पवन चव्हाण युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.
धाराशिवमधील मुरुम गावातील नाईक नगर येथील पवन गोपीचंद चव्हाण (वय ३२) या युवकाने बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट(St) प्रमाणे आरक्षण मिळावे असा आशयाची सुसाईड नोट मयत युवकाने लिहून ठेवली आहे. पवनने बंजारा आरक्षणासाठी शनिवार (दि.१३) रोजी सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरातील बांबूला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांना मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. हैद्राबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यावे अशी मागणीचे पत्र त्याने लिहून ठेवल्याचे आढळले.