धारूर

धारूरच्या घाटात कार ३०० फूट दरीत कोसळली…

धारुर प्रतिनिधी:–

धारूर घाट म्हणजे अपघाताचा माहेरघरच म्हणायचं रोजच अपघात होऊन मृत्युची संख्या वाढत आहे या अवघड घाटात रविवार (दि.२२) रोजी सकाळी ०९ च्या दरम्यान घाटातील अरुंद रस्ता व संरक्षण भिंती निकामी झाल्याने धारूर कडून माजलगावकडे जाणाऱ्या कारचा ताबा सुटून कार  ३०० फूट खोल दरीमध्ये जाऊन कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

धारूर घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. घाटातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक दिवसापासून नागरिक प्रवासी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. घाटातील अरुंद रस्ता संरक्षण भिंती निकामी झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवार (दि.२२) रोजी सकाळी ०९ च्या दरम्यान धारूर कडून माजलगाव कडे जाणारी  हुंडाई कंपनीची एमएच २२ ए डब्ल्यू २३६३ कार चा ताबा सुटून संरक्षण भिंती निकामी झाल्याने कार दरीमध्ये तीनशे फूट जाऊन कोसळली. या अपघातामध्ये भीमराव पायाळ (वय ५८),संदीप पायाळ (वय ५६) हे दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी आले आहेत. त्यांच्यावर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. घाटातील समस्या दूर करण्यासाठी अनेक दिवसापासून प्रवासी नागरिक मागणी करत असून मागील दोन दिवसापूर्वी घाटासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केला आहे. पण हा निधी मी पाठपुरावा केल्यामुळे आला अशा पोस्ट लोकप्रतिनिधी करत आहेत. पण कित्येक दिवसापासून या घाटातील समस्या प्रवासी नागरिक सहन करत आहेत. यात कित्येक जणांचा बळी गेला, अपंगत्व आले याची जिम्मेदारी कोणी घेणार आहे का ? असा प्रश्न प्रवासी नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893905
error: Content is protected !!