धारूर प्रतिनिधी :-
तालुक्यातील पहाडी दहीफळ येथे सर्पदंशाने पहिलीत शिक्षण घेणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि.१६) रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वरी हरीभाऊ नागरगोजे (वय ८) ही पहाडी दहीफळ (ता. धारुर) या गावाशेजारील आपल्या शेतातील घरात झोपलेल्या अवस्थेत होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास तिला सर्पदंश झाला. कुटूंबियांच्या सदर प्रकार लक्षात येताच मुलीस वडवणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे मुलीस बीडकडे हलवण्यात आले. प्रवासातच तिचा मृत्यु झाला.