किल्लेधारूर प्रतिनिधी :– आंध्रप्रदेशामधून तेलगावकडे जाणारा सिमेंटचा मालवाहतूक ट्रक धारूर घाटाच्या अवघड वळणावर मंगळवार (दि.१७) रोजी दरीत कोसळला. या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले.सतत अपघाताची मालिका सुरूच असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या घाटातून प्रवास करावा लागत आहे.
खामगाव -सांगोला पालखीमार्ग राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी या वर सध्या वाहतूक वाढली आहे. मात्र धारूर तेलगाव मार्गावर धारूर येथील डॉ आ़बेडकर चौक ते धुनकवड पाटी हा बारा किलोमीटर रस्ता अरू़द ठेवला आहे. या मध्ये तिन किलोमीटरचा अवघड घाट आहे. एका बाजूला खोल दरी व अरू़द असल्याने या मार्गावर नियमीत अपघाताची मालीका सुरूच आहे. आठवड्यात वाहन दरीत कोसळल्याच्या दोन तिन तरी घटना घडतात. मंगळवारी सि़मेट वाहतूक करणारी मालवाहतूक ट्रक क्रमांक ए.पी ३९ टीसी २४४६ हि आ़ध्रप्रदेशातून आलेली तेलगावकडे जाणारी गाडी धारूर घाटात एका अवघड वळणार तटरक्षक भिंत तोडून दरीत जाऊन कोसळली.नियमीतच्या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक करणारे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घाटाचे रुंदीकरण केव्हा होणार? सुरक्षीत प्रवास केव्हा होणार? असा प्रश्न प्रवाशी वर्गातुन केला जात आहे.
