केज प्रतिनिधी :–केज तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर दोन आरोपींनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंत पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर संबंधित अल्पवयीन पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पीडितीची प्रकृती चिंताजनक
घटनेनंतर पीडितेला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
आरोपींनी बळजबरी करत…
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बळजबरी करत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पीडितेच्या आई-वडिलांनी तातडीने केज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
