पुणे

वैष्णवी हगवणे यांचे प्रकरण ताजे असताना आणखी एक घटना….

पुणे प्रतिनिधी:–

 वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील हडपसर मधील घटना समोर आली आहे. मनासारखा हुंडा, मानपान न दिल्याच्या कारणावरुन सुनेचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आला. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. देवकी प्रसाद पुजारी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासु सुरेखा चंद्रकांत पुजारी व सासरे चंद्रकांत पुजारी यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपाचे वडिल गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात दीपा व प्रसाद यांचा विवाह झाला. लग्न सोहळ्यात दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला चार तोळे सोने दिले यासह मानपानप्रमाणे १० लाख रुपये खर्च करुन लग्न करुन दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दीपा पुण्यात आली. त्याच दिवसापासून प्रसाद व त्याची आई सुरेखाने लग्नात भांडी, फ्रीज दिले नाहीत. यासह मानपान केला नाही म्हणून वाद घालून तिला शिवीगाळ केली. दीपाने तिच्या वडिलांना ही हकीगत सांगून माहेर गाठलं. परंतु त्यानंतर दीपाच्या सासऱ्याने तिची समजूत घातली आणि तिला पुन्हा पुण्यात आणलं. १८ मे रोजी दीपाने वडिलांना फोन केला व ती रडू लागली आणि लग्नात भांडी सामान दिले नाही. म्हणून प्रसाद, दीर, सासु, सासरे शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचे सांगितले. दिपाच्या वडिलांनी मी पुण्यात येतो व वाद सोडवितो असे सांगून तिची तात्पुरती समजूत काढली. पण १९ मे रोजी दीपा हिने हडपसर मध्ये वास्तव्यास असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893908
error: Content is protected !!