वडवणी प्रतिनिधी :
वडवणी तालुक्यातील चिखलबीड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या देठेवाडी तलावात एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली होती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह तलावाच्या बाहेर काढला असता ओळख पटली असून वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे डॉ. शुभम यादव यांचा मृतदेह असल्याची ओळख पटली आहे.
वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे डॉ. शुभम बालकनाथ यादव रा. देवळा ता.अंबाजोगाई हल्ली मुक्काम बीड हे एक दिवसापासून बेपत्ता होते बेपत्ता असल्याची तक्रार डॉ.यादव यांचे वडील बालकनाथ यादव यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास देटेवाडी तलावात डॉ.शुभम बालकनाथ यादव यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मानसिक ताणवाखाली येऊन आत्महत्याचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी रात्री 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदरील या घटनेने वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली ? कशामुळे केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वडवणी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस करत आहेत. गेल्या पंधरा दिवसात वडवणी तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.