
अंबाजोगाई(प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील वाहतूक विस्कळीत करणाऱ्या बेधुंद रिक्षा चालकास ताळ्यावर आणण्यासाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पावले उचलली आसुन
या संदर्भात शहरातील सर्व रिक्षा चालकांची एक बैठक घेऊन मार्गदर्शक सुचना वजा एक प्रकारे तंबीच दिली आहे.

मागील अनेक वर्षां पासून अंबाजोगाई शहरातील वाहतूक व्यवस्था मोडखळीस आणण्यास दिवसेंदिवस वाढणाऱ्या रिक्षा कारणीभूत असून पोलीस यंत्रणा बेशिस्त पणे चालणाऱ्या रिक्षाचालकास शिस्त लावण्यात कुचकामी मजबूत आहे हे सत्य नाकारून चालत नाही.
आज ही शहरात मुंबई पुण्या मधून कंडम म्हणून घोषित केलेल्या अनेक रिक्षा मोठ्या प्रमाणात सुरु असून सर्व रिक्षा चालकांना शिस्त लावणे ही काळाची गरज निर्माण झाल्याने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आता पावले उचलल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहरांमध्ये रिक्षावाल्यांची बैठक घेऊन या बैठकीत सर्वांना मार्गदर्शक सुचना देत एकप्रकारे सज्जड असा दमच दिला आहे असे म्हणावे लागेल.
या बैठकीत रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करणे, शाळेतील मुलांना घेऊन जाताना विशेष काळजी घेणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी यांची वाहतूक न करणे, चालकांनी व्हॅन अथवा रिक्षा यांची सर्व कागदपत्र स्वतःजवळ सोबत ठेवणे, विद्यार्थी वाहतूक करताना आवश्यक ती सर्व सुरक्षा उपाय योजना करणे, रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी रिक्षा उभ्या न करणे विशेषता बस स्टँड परिसरात रीक्षा न थांबवणे, यासह व इतर वाहतूक विषयी सूचना देण्यात आल्या. यावेळी या बैठकीस 100 ते 150 रिक्षा चालक व वॅन चालक तिथे उपस्थित होते.रिक्षा चालकांच्या अडीअडचणीही समजून घेण्यात आल्या. येणाऱ्या सोमवार पर्यंत सर्वानी कागदपत्राची व इतर बाबीची पूर्तता करणे बाबत सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर पोलीस वाहतूक विभागातर्फे नियमित कारवाई करण्यात येणार आसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
