अंबाजोगाई अशोक दळवे :-
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्शवत संदेश देत अशोक आडे मित्रमंडळाच्या वतीने अशोक आडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णालयातील रक्तसाठ्याची कमतरता लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज ओळखून अशोक आडे मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश देत युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून उपक्रमाला यशस्वी केले.
या उपक्रमासाठी डॉ. विनय नालपे, डॉ. अमोल कापसे, डॉ. ऋषिकेश, डॉ. अक्षय कदम, डॉ. आकांक्षा उमरेडकर, डॉ. परवीन शेख, श्री. शशिकांत पारखे, श्री. आनंद सिताप, श्री. बाबा शेख, श्री. अमोल चव्हाण, श्री. महादेव शिरसाठ आणि श्री. माधव गोचडे यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल अशोक आडे मित्रमंडळाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
रक्तदान शिबिरानंतर सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढे नेत कुरणवाडी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फळे आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला माजी आमदार पृथ्वीराज साठे, ग्रामपंचायत सरपंच रामराव आडे, उपसरपंच अनिल शिंदे, भावठाणा उपसरपंच आर डी नायक, वसंत नगर तांडा सरपंच विजय राठोड,युवकांचे प्रेरणास्थान अजित चव्हाण,युवकांचे प्रेरणास्थान दिपक भैय्या शिंदे, पवन चव्हाण, रफिक गवळी, लहू आडे, गजानन आडे, विजय जाधव, देवा जाधव, रमेश आडे, सुरेश जाधव, विजय राठोड, कुंडलिक जाधव, प्रकाश आडे, गणेश जाधव, पवन आडे, अनिल राठोड, दिलीप पवार, देवा आडे, प्रवीण आडे, उमेश आडे, विष्णू आडे, अमोल आडे, शुभम आडे, विकास आडे, ईश्वर आडे, अजय आडे, राहुल आडे, रविकांत आडे, लक्ष्मण पवार, संजय राठोड, कैलास राठोड, अविनाश चव्हाण, रवी राठोड, श्याम आडे, समाधान आडे, अजित आडे, पप्पू आडे यांच्यासह अशोक आडे मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना याचा लाभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
