बीड प्रतिनिधी :–केजमधील विलास घुले या तरुणाचा खून झाल्याप्रकरणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात घुलेच्या हत्यावर प्रश्न उपस्थितीत करत पोलिसांना आरोपीच्या शोध घेऊन गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावे अशी मागणी केली होती.सलग तिसऱ्या दिवशी हजारो लोकं रस्त्यावर उतरल्यानंतर आणि मुंडेंनी सभागृहात प्रश्न उपस्थितीत करत आवाज उठवल्यामुळे अखेर छत्रपती संभाजीनगरवरून आयजी विरेंद्र मिश्रा बीडमध्ये काही वेळापूर्वी दाखल झाल्याची माहिती आहे. आता बीड पोलीस दल घुले खून प्रकरणात काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
केज – मांजरसुंबा रस्त्यावरील टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा दरम्यान असलेल्या गावकरी हॉटेलवर बसलेल्या उमेश माने यास अनैतिक संबंधावरून बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गुरुबा कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम रामभाऊ गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ परसराम कदम, दिपक परसराम कदम, संतोष नरहरी कदम हे नऊ जण २० जून रोजी रात्री ७.३० वाजता मारण्यास आले होते. याचवेळी हॉटेल चालक विलास नवनाथ घुले हा तरुण भांडण सोडविण्यास गेला असता त्यास तू मध्ये पडू नको, म्हणत रामेश्वर गायकवाड (रा. सोनीजवळा ता. केज) याने चाकूने पोटात भोसकल्याने गंभीर झाला होता. उपचारादरम्यान २१ जून रोजी दुपारी ३ वाजता अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात विलास घुले याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वरील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत बाबासाहेब कदम, संतोष कदम या दोघांना अटक केली आहे.मात्र घडलेल्या गुन्ह्यात आरोपीच्या पाठबळासाठी खासदार पुत्राने मदत केल्याचा आरोप करत घुले कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. तीन दिवसापासून हा प्रश्न पेटला असून लोकं हजारांच्या संख्येने रस्त्यावर येतं असताना अजूनही पोलिसांना यात तोडगा काढण्यात यश आलेले नाही. तर दुसरीकडे पोलीस दलाचे घटकप्रमुख स्वतः कार्यालयात बसून हे प्रकरण हाताळत असल्याने असेल कदाचित हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. स्वतः कॉवत रस्त्यावर उतरले तर मोर्चेकरांना समजावून सांगत त्यांना हे आंदोलन सोडविण्यासाठी यशही येऊ शकते. कारण तीन दिवसांत एम व्यंकटराम असतील किंवा चेतना तिडके यांना अजूनही तोडगा काढता आलेले नसून कॉवत यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागले असताना आता आयजी देखील संभाजीनगरवरून बीडला आले आहेत. त्यामुळे मिश्रा आणि कॉवत यांच्यामध्ये चर्चा सुरु असून बीड पोलिसांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.
