परळी |प्रतिनिधी :-
परळी शहरातील मोहम्मदिया कॉलनीजवळील घनशी नदीपात्राच्या काठावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह रविवार (दि. २६) रोजी सकाळी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
माहितीनुसार, नागरिकांना नदीकाठी मृतदेह दिसून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वृत्त लिहिपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून परळी शहर पोलीस मृताची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत.
