परळी प्रतिनिधी :- तालुक्यातील धर्मापुरी शिवारातील अहमदपूर–अंबाजोगाई मार्गावर मारुती सुझुकी ब्रेझा करमध्ये गांज्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळताच शुक्रवार (दि.३)रोजी रात्री कारवाई करत ४९ किलो गांजासह २९ लाख ५४ हजार १६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने परळी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने धर्मापुरी शिवारातील अहमदपूर–अंबाजोगाई मार्गावर सापळा रचला.संशयित मारुती सुझुकी ब्रेझा कारची तपासणी केली असता त्यामध्ये ४९ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह वाहन असा एकूण २९ लाख ५४ हजार १६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अनिल बिभीषण फड (वय २५) व अरबाज युसूफ सय्यद (वय २३),दोघे रा. धर्मापुरी, ता. परळी यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी ईश्वर नवनाथ फड व श्रीकांत भास्कर फड यांच्या साथीने गांजाची वाहतूक केल्याची कबुली दिली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरील कारवाई नवनीत काँवत पोलीस अधीक्षक, बीड, चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक, बीड, ऋषीकेश शिंदे, सहा. पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई व शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोह.रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, गोविंद राख, विकास राठोड, पोअं.सचिन आंधळे, बबन सलगर, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे, सुनिल राठोड तसेच पोलीस ठाणे परळी ग्रामीणचे पोनि मल्हार शिवरकर, पोउपनि श्री.निमोने, पुजरवाड, पो.हवा श्री.वाले,श्री.केदार,श्री.पोकळे यांनी केली आहे.
