अंबाजोगाई प्रतिनिधी :
बीड जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक बीड यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक कार्यरत होते. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १३२/२०२६ कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत दाखल दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची माहिती मिळविण्यात आली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, संतोष बाबासाहेब मुंडे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) याने बीडसह शेजारील जिल्ह्यांतून अनेक दुचाकी चोरी करून आपल्या घराच्या मागील बाजूस लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.
दिनांक १५ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून संतोष मुंडे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या दुचाकी लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यामध्ये अंबाजोगाई शहरातून चार, पुणे जिल्ह्यातून एक, लातूर जिल्ह्यातून एक आणि परभणी जिल्ह्यातून एक अशा एकूण सहा दुचाकी मिळून आल्या. (पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.)
तपासादरम्यान खालील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत –
अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १३२/२०२६ कलम ३०३(२) बीएनएस
अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३२४/२०२५ कलम ३०३(२) बीएनएस
गंगाखेड पोलीस ठाणे, जि. परभणी गु.र.नं. २९/२०२६ कलम ३०३(२) बीएनएस
इतर दुचाकींच्या मालकी व अभिलेखाबाबत अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत. आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.ही उल्लेखनीय कामगिरी त्या बाबत अधिक तपास पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर हे करीत आहेत.
तरी आरोपीचे ताब्यातून एकुण 2,20,000/- मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कामगिरी श्रीमती चेतना तिडके, प्रभारी पोलीस अधीक्षक, बीड, श्री. ऋषिकेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड अंबाजोगाई, श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे व चालक अतुल हराळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.
.
