केज प्रतिनिधी::–
केज विधानसभा मतदार संघातील डॉ.प्रतिभाताई अशोकराव थोरात यांनी महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा शिवसेने चे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना बीड लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, मराठवाडा सचिव अशोकराव पटवर्धन आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,अनिल जगताप,स्वप्निल गलधर यांसह यावेळी उपस्थित संगीताताई चव्हाण शिवसेना महिला संपर्क प्रमुख बीड जिल्हा, शिवसेना विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे, युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे, हे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.प्रतिभाताई अशोक थोरात यांच्या समवेत सर्व श्री उद्धव दळवी, प्रमोद पाटील, राजा शेख, नंदकुमार कावळे,लाला काकडे, अशोक पांचाळ, दादासाहेब घुगे,जीवन थोरात, विलास अंबाड, लालासाहेब शिंदे,दत्ता काकडे,अनिल जोगदंड, बजरंग काकडे,प्रकाश थोरात आदी मान्यवरांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश झाला. ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सर्वांना पक्षप्रवेश देऊन शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या पक्ष प्रवेशामुळे केज मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर हा प्रवेश संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
